लतादीदींच्या पार्थिवाजवळ अभिनेता शाहरुख दुआ मागून फुंकला, थुंकला नाही!, वाचा काय आहे ही परंपरा..

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही तुफान गर्दी होती. आपल्या घरातीलच कुणी व्यक्ती गेली आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु याप्रसंगी अभिनेता शाहरुख खानने केलेल्या एका कृतीमुळे काहीजण विनाकारण त्याच्यावर टीका करत आहेत. वास्तविक, शाहरुखने लतादीदींच्या पार्थिवाजवळ उभा राहून दुआ मागितली आणि इस्लामी परंपरेप्रमाणे फुंकला, त्याला काही जण तो थुंकला असे म्हणून ट्रोल करत आहेत. यावर अनेक राजकारण्यांनीही ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.Actor Shah Rukh blew after Dua near Latadidi dead body, He did not spit, read what is this tradition


प्रतिनिधी

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही तुफान गर्दी होती. आपल्या घरातीलच कुणी व्यक्ती गेली आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

परंतु याप्रसंगी अभिनेता शाहरुख खानने केलेल्या एका कृतीमुळे काहीजण विनाकारण त्याच्यावर टीका करत आहेत. वास्तविक, शाहरुखने लतादीदींच्या पार्थिवाजवळ उभा राहून दुआ मागितली आणि इस्लामी परंपरेप्रमाणे फुंकला, त्याला काही जण तो थुंकला असे म्हणून ट्रोल करत आहेत. यावर अनेक राजकारण्यांनीही ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.६ फेब्रुवारीला संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्कवर देशातील नामवंत व्यक्ती गोळा झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वच लतादीदींच्या पार्थिवाजवळ नतमस्तक झाले. सर्वांच्या लाडक्या लतादीदींचे पार्थिव चितेवर जाण्यापूर्वी त्यांना पाहून सर्वजणांनी त्यांना आपापल्या परीने अखेरचा निरोप दिला.

बॉलीवूड स्टार शाहरुख खान जेव्हा लता दीदींना अखेरचा अभिवादन करण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याने दोन्ही हातांनी दुआ मागितली. शाहरुखने लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली. दुआ वाचून मास्क काढला आणि फुंकर घातली.

लतादीदींकडे पाहिले आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून प्रेम आणि आदर व्यक्त केला. त्यानेही हात जोडून नमस्कारही केला. परंतु, यानंतर शाहरुख फुंकलाऐवजी ‘थुंकला’ म्हणत काही जणांनी ट्रोल करायला सुरुवात केली. ‘फुंकणे’ चे ‘थुंकणे’ असे सांगून नवा वाद या लोकांनी सुरू केला आहे.

इस्लाममध्ये दुआ मागून फुंकण्याची परंपरा

इस्लामिक परंपरेनुसार, जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा दोन्ही हात छातीवर उभे करावे लागतात आणि अल्लाहला प्रार्थना केली जाते. जसे एखाद्यासमोर पदर पसरवणे म्हटले जाते, त्याच पद्धतीने दोन्ही हात एकत्र पसरवून त्यांची अल्लाहसमोर विनंती केली जाते.

एखाद्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना, कोणाच्या नोकरीसाठी प्रार्थना किंवा एखाद्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना… काहीही असू शकते. दोन्ही हात जोडून प्रार्थना केल्याचे चित्रही चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. लतादीदींच्या पार्थिवासमोर शाहरुखने हेच केले होते. लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना लतादीदींचे लाखो-करोडो चाहते करत असतीलच.

शाहरुख जेव्हा दोन्ही हात पसरून प्रार्थना करत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळा मास्क होता. त्याने सुमारे 12 सेकंद प्रार्थना केली आणि नंतर तोंडावरचा मास्क सरकवला. मास्क काढून त्याने किंचित वाकून लतादीदींच्या अंगावर फुंकर घातली.या फुंकण्याला थुंकणे असे म्हणत अपप्रचार केला जात आहे. ट्विटरवर काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत ट्रोल केले आहे.

जर तुम्हाला इस्लामिक दृष्टिकोनातून समजून घ्यायचे असेल तर प्रार्थना करण्याची ही पद्धत खूप सामान्य आहे. मशिदी किंवा दर्ग्यातही तुम्ही अशी दृश्ये पाहिली असतील. जेव्हा एखादे पालक आपल्या मुलासाठी मुफ्ती किंवा मौलानाकडे प्रार्थना करत असतो, ते प्रार्थना करतात आणि नंतर मुलावर फुंकर मारतात. हेच वडिलांसाठी देखील केले जाते, कारण दुआ कोणत्याही मनुष्यासाठी केली जाते.

Actor Shah Rukh blew after Dua near Latadidi dead body, He did not spit, read what is this tradition

महत्त्वाच्या बातम्या