भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत; राज ठाकरेंची श्रद्धांजली


प्रतिनिधी

मुंबई : भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आपल्यातून निघून गेला, अशा भावपूर्ण शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विक्रम गोखले यांच्या विविध राजकीय आणि सामाजिक भूमिकांमुळे मोठे वाद निर्माण झाले होते. परंतु, ते नेहमीच आपल्या भूमिकांवर ठाम राहिले, हा मुद्दा राज ठाकरे यांनी आपल्या श्रद्धांजली पोस्टमध्ये विशेषत्वाने अधोरेखित केला आहे. actor playing the role of acting; Tribute to Raj Thackeray

राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर विक्रम गोखले यांना वाहिलेली श्रद्धांजली :

मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात अनेकदा असं जाणवतं आलंय की अनेक अभिनेते जरी तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय हा कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे ह्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेकी उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमला होती.तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं.
मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही.
भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.

actor playing the role of acting; Tribute to Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण