वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात कात्रजजवळ तरुणाचा धारधार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. शिविगाळ केल्याचा संतापातून हा खून केल्याचे उघड होत आहे. A young man was stabbed to death near Katraj in Pune Brutal murder by stabbing; Anger at being abused
कात्रजजवळील गुजर निंबाळकरवाडी याठिकाणी हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली. दशरथसिंग राजपूत असे हत्या झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो गुजर निंबाळकरवाडी येथील सणसनगर स्मशानभुमीजवळील रहिवासी होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी समीर बापू निंबाळकर (वय- ३१) याला जेजुरी येथून अटक केली आहे.
मृत दशरथसिंग राजपूत आणि आरोपी समीर निंबाळकर हे एकमेकांच्या शेजारी राहतात. मृत राजपूत शेळीपालनाचा व्यवसाय करायचा तसेच त्याला दारूचं व्यसन देखील होतं. शुक्रवारी सायंकाळी राजपूत दारू पिऊन घरी आला होता. यावेळी त्याने घराशेजारी राहणाऱ्या आरोपी समीरच्या वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.
शिवीगाळ ऐकून समीर आणि राजपूत दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी समीरने दारूच्या नशेत असणाऱ्या राजपूतला जोरदार धक्का दिला. यावेळी राजपूत जमिनीवर खाली पडला. रागाच्या भरात असणाऱ्या समीरने जवळच पडलेल्या लोखंडी धारदार वस्तूने राजपूतवर सपासप वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App