प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील हडपसर भागात एक उद्यान उभारण्यात आले. त्याचे नाव एकनाथ शिंदे उद्यान ठेवले. पण हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात आला असून ऐनवेळी हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती होती. खुद्द एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार असता उद्यानाचे नाव धर्मवीर आनंद दिघे उद्यान करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत देखील याचा खुलासा केला. A quick renaming of a park in Hadapsar
मात्र, पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या उद्यानाला आता धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली. तसेच, याबाबतची सर्व प्रशासकीय मान्यता आणि परगवानग्यांची प्रक्रियाही पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिले होते. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला. त्यामुळेच, आपण हे नाव देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, याबाबत माहिती मिळताच एकनाथ शिंदेंनी या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघेंचे नाव देण्याचे सूचवले. त्यानुसार, या उद्यानाला आनंद दिघेंचे नाव देण्यात येईल, या संदर्भात माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App