सुषमा अंधारे यांच्याकरवी धुळ्याच्या शकील बागवानांचा संदेश; उद्धवजी, तमाम मुस्लीम कौम आपके साथ है!!

प्रतिनिधी

मुंबई : आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्याकरवी धुळ्याच्या शकील बागवान यांनी उद्धव ठाकरे यांना संदेश पाठवला आहे. A message from Shakeel Bagwans of Dhule by Sushma Andhare

धुळ्याचे शकील बागवान म्हणाले की, ‘ताई हमारा पैगाम देना, हम धुलीयासे है. तमाम मुस्लीम कौम आपके साथ है. हम भाजप का डट कर सामना करेंगे. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या विविध भागातील मुस्लीम जनसमुदायाच्या मनातील भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्या. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांनी हातात शिवबंधन बांधले.

सुषमा अंधारे यांनी गुरुवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सुषमा अंधारे यांनी राज्याच्या विविध भागातील मुस्लीम जनसमुदाय उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. धुळे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही नागरिकांनी मला फोन उद्धव ठाकरे यांना एक संदेश द्यायला सांगितला. धुळ्याचे शकील बागवान म्हणाले की, ‘ताई हमारा पैगाम देना, हम धुलीयासे है. तमाम मुस्लीम कौम आपके साथ है. हम भाजप का दट कर सामना करेंगे’.

सुषमा अंधारे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात एकनाथ शिंदे गटातील बंडखोरांना टोले लगावले. माझ्या डोक्यावर ना ईडीच्या फाईलचं ओझं आहे, ना माझ्यासमोर कोणतही प्रलोभन आहे. मी शिवसेनेत कोणत्याही पदासाठी प्रवेश केलेला नाही. त्याऐवजी मी राज्यातील प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातील बहीण आणि लेक होण्याचा प्रयत्न करेन. मला अजूनही शिवसेनेतील पीठा-मीठाचे, चहा-साखरेचे डबे माहिती नाहीत, येथील पद्धती माहिती नाहीत. त्यामुळे मला सांभाळून घ्या. निलमताई गोऱ्हे या मला आईप्रमाणे सांभाळून घेणाऱ्या आहेत, तर सचिन अहिर यांच्या रुपाने माहेरचा माणूस माझ्यासोबत आहे. मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आज जोरजोरात गळे काढून रडायचे आणि नंतर दुसऱ्या गटात सामील व्हायचे, असा प्रकार मी करणार नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

– अंधारे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

मी शिवसेनेवर पूर्वी जरूर टीका केली आहे. पण माझं जे बोलायचं होते ते बोलून झालंय, आता सर्व गोष्टी क्लिअर आहेत. कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू परवडतात. त्यामुळे मी कधीकाळी शिवसेनेवर टीका केली असेल. पण आज संविधानाच्या शत्रूंविरोधात लढण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करायला तयार आहे, असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी उपनेतेपदावर नियुक्ती केली.

A message from Shakeel Bagwans of Dhule by Sushma Andhare

महत्वाच्या बातम्या