डोंबिवली अल्पवयीन सामूहिक बलात्कारप्रकरणी ८८५ पानांचे आरोपपत्र दाखल, ३३ जणांवर आरोप, 121 साक्षीदारांचे जबाब


डोंबिवली सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह सर्व ३३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला डोंबिवलीतील एका १५ वर्षीय मुलीवर आठ महिन्यांत अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातील मानपाडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी नुकतेच कल्याण सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 885-page chargesheet filed in Dombivali juvenile gang rape case, charges against 33 persons, 121 witnesses


वृत्तसंस्था

ठाणे : डोंबिवली सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह सर्व ३३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला डोंबिवलीतील एका १५ वर्षीय मुलीवर आठ महिन्यांत अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातील मानपाडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी नुकतेच कल्याण सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

यावर्षी २२ सप्टेंबर रोजी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे आरोपपत्र ८८५ पानांचे असून १२१ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपींनी या वर्षी 29 जानेवारी ते 22 सप्टेंबरदरम्यान डोंबिवली, बदलापूर, मुरबाड आणि रबाळेसह वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिला अंमली पदार्थही देण्यात आले.

या प्रकरणातील एकूण 33 आरोपींपैकी चार अल्पवयीन सध्या जामिनावर बाहेर आहेत, तर 29 जण न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६ (एन) (वारंवार बलात्कार), ३७६ (डी) (सामूहिक बलात्कार), ३७६ (३) (१६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आणि बाल लैंगिक अपराधांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

885-page chargesheet filed in Dombivali juvenile gang rape case, charges against 33 persons, 121 witnesses

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात