कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मिरजेच्या अॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. महेश जाधव असे या डॉक्टराचे नाव असून महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे 87 corona patients die in Miraj due to treatment negligence, Apex Hospital chief doctor arrested
विशेष प्रतिनिधी
सांगली : कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मिरजेच्या अॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. महेश जाधव असे या डॉक्टराचे नाव असून महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे
कोरोनाच्या दुसºया लाटेच्या कालावधीत उपचारासाठी मिरजेतील अॅपेक्स हॉस्पिटलला कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्यात रुग्णांची हेळसांड, त्यातून मृत्यू आणि अधिक बिले आकरल्याचा प्रकार समोर आला होता.
रुग्णालया विरोधात अनेकांनी तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेऊन सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी याप्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर महेश जाधव याच्यासह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास सुरु असताना हॉस्पिटलमध्ये 205 रूग्णांवर उपचार सुरु होता. त्यापैकी तब्बल 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. तसेचत रुग्णालय प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने महात्मा गांधी चौक पोलिसांकडून याबाबत सखोल तपास करण्यात आला. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App