प्रतिनिधी
पुणे : सामान्य रूग्णांसाठी आवाक्यातील खर्चात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवांच्या उद्देशाने पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस रूग्णालयाच्या भूमिपूजन सोहळा शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होतो आहे. कात्रज भागातील खडी मशीन चौकात ८०० बेडचे हे रूग्णालय दोन टप्प्यात उभारले जाणार आहे, अशी माहिती पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरीषजी देशपांडे व कार्यवाह बद्रीनाथजी मूर्ती यांनी पत्रकार परिषदेला ही माहिती दिली. 800-bed Balasaheb Deoras Hospital to be built in Pune
या निमित्ताने आयोजित भूमिपूजन समारंभाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसूख मांडवीय, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश उर्फ भैय्याजी जोशी, पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे मानद अध्यक्ष व राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पूज्य. गोविंद देव गिरीजी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदर पूनावाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
खडी मशीन चौकातील प्रस्तावित ८०० बेडचे सुसज्ज रूग्णालय व अद्ययावत वास्तुच्या भूमिपूजन सोहळा समारंभ पुणे- सातारा रस्त्यावरील बिववेवाडी स्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सकाळी १०.३० वाजता होणार आहे. नागरिकांनी अण्णाभाऊ साठे सभागृहात कार्यक्रमास लक्षणीय संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाचे तृतीय सरसंघचालक श्रद्धेय बाळासाहेब देवरस हे आणीबाणीतील काही वर्षे पुण्याच्या येरवड्याच्या तुरूंगात होते आणि आयुष्यातील शेवटची काही वर्षे मित्रमंडळ चौकात स्थित कौशिक आश्रमात त्यांचा निवास होता. सेवेच्या आयामाला त्यांनी दिलेली दिशा याचा विचार व दृष्टी समोर ठेवून त्यांचेच नाव या रुग्णालयाला द्यावे, असे प्रतिष्ठानने ठरविले.
पुण्यातील अनेक तज्ज्ञ व मान्यवर डॉक्टरांच्या टीमची या प्रकल्पासाठी मदत घेऊन याचे सविस्तर नियोजन होते आहे. मान्यवर आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिकाची या प्रकल्पासाठी निवडून २०२५ साली संघाला १०० वर्षे होत असताना या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App