गणेशोत्सवासाठी कोकणाकडे ७२ रेल्वेगाड्या धावणार ; रेल्वे राज्यमंत्री दानवे ; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गणेशोत्सवासाठी कोकणात जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रवाशांची होणारी गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. 72 trains to run to Konkan for Ganeshotsav: Minister of State for Railways Danve; Decisions to avoid inconvenience to passengers

सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष ७२ रेल्वेगाड्या चालवणार आहोत,असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल.

या गाडीच्या एकूण ३६ ट्रिप होतील. तसेच CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या १० ट्रिप होणार आहेत. पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या १६ ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या एकूण १० ट्रीप होणार आहेत, असे मंत्री दानवे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवासा दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळलेच पाहिजे. ७२ गाड्या सोडूनही जर वेटींग असेल, प्रवासाची अडचण होत असेल तर रेल्वे मंत्रालयाने आणखी गाड्या
सोडाव्यात, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिले आहेत. मात्र कोकणवासीयाची प्रवासा दरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत.

72 trains to run to Konkan for Ganeshotsav: Minister of State for Railways Danve; Decisions to avoid inconvenience to passengers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात