विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ७१ हजार ७३६ रुग्णांना सोमवारी घरी सोडले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.4 lakh 42 thousand people free from corona, picture of six days in the state; Information of Health Minister Rajesh Tope
राज्यात दोन महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळले होते.
आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत वाढ झालेली आढळली नाही. मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.
आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नवीन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App