गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरातील अनेक गावांत रविवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिष्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 नोंदवली गेली.4.3 magnitude earthquake shakes Gadchiroli district
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरातील अनेक गावांत रविवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिष्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 नोंदवली गेली. जिल्ह्यातील अहेरी ते सिरोंचादरम्यान या केंद्रबिंदू होता. तेलंगणातील काही गावांपर्यंत धक्के जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितले की, गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ प्राणहिता या नदीजवळ केंद्रबिंदू असावा. आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App