माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात दावा केला की, मुंबईतील एकूण घटस्फोटांपैकी तीन टक्के घटस्फोट येथील ट्रॅफिक जाममुळे होतात.3 Percent divorce in Mumbai due to traffic jam, Mayor Kishori Pednekar criticizes Amrita Fadnavis statement
वृत्तसंस्था
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात दावा केला की, मुंबईतील एकूण घटस्फोटांपैकी तीन टक्के घटस्फोट येथील ट्रॅफिक जाममुळे होतात. अमृता म्हणाल्या की मीदेखील एक सामान्य नागरिक आहे आणि दररोज प्रवास करते, पण ट्रॅफिक जाममुळे मी खूप अस्वस्थ होते. मुंबईत प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यामुळे लोक आपल्या कुटुंबीयांना वेळ देऊ शकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
हे महाविकास नाही, महावसुली सरकार : अमृता फडणवीस
यावेळी अमृता फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. हे महाविकास नसून महावसुली सरकार आहे आणि हे फक्त मीच बोलत नाही तर संपूर्ण जग बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, मुंबईत असे अनेक प्रश्न आहेत ज्याकडे सरकार लक्ष देत नाही. मुंबईत रस्ता, वाहतूक आणि एसटी कर्मचाऱ्यांची समस्या आहे. सरकारचे लक्ष हे सर्व सोडून स्वतःचे खिसे भरण्यावर आहे.”
महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले हे उत्तर
अमृता फडणवीस यांच्या आरोपांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, मुंबईचे रस्ते गुळगुळीत असल्याचा दावा आम्ही कधीच केला नाही, मात्र माहिती मिळताच आम्ही रस्ते दुरुस्त करतो. ट्रॅफिक जाममुळे घटस्फोटाचे विधान पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या. भाजप सध्या मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत महापौरांनी पलटवार केला.
दुसरीकडे, अमृता फडणवीस यांच्या या विधानाची शिवसेनेच्या महिला नेत्यांनी खिल्ली उडवली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या की, “आमच्या मामी नवनवीन संशोधन करत आहेत असे दिसते. त्यांच्यासाठी विशेष बौद्धिक शिबिर आयोजित केले पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App