महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जबरदस्त धक्का, मालेगावच्या नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


महानगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेल्यांमध्ये महापौर तायरा शेख रशीद आणि त्यांचे पती शेख रशीद हे प्रमुख चेहरे आहेत. महापौर तायरा शेख रशीद यांचे पती शेख रशीद हे दोन वेळा आमदार राहिले आहेत. 28 corporators including Malegaon mayor join NCP before municipal elections


विशेष प्रतिनिधी

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेल्यांमध्ये महापौर तायरा शेख रशीद आणि त्यांचे पती शेख रशीद हे प्रमुख चेहरे आहेत. महापौर तायरा शेख रशीद यांचे पती शेख रशीद हे दोन वेळा आमदार राहिले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर तैरा शेख रशीद आणि त्यांचे पती शेख रशीद यांच्या उपस्थितीत २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी अजित पवार यांनी नव्याने प्रवेश झालेल्या नगरसेवकांना सल्ला देताना म्हटले की, राष्ट्रवादी पक्ष बदनाम होणार नाही, गालबोट लागणार नाही आणि लोकांमध्ये चुकीचा संदेश जाणार नाही, याची खबरदारी घ्या. राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकमेकांवर कुरघोडी सुरूच आहे. काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसच्या प्रतिक्रियेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

28 corporators including Malegaon mayor join NCP before municipal elections

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण