धुळवडीच्या दिवशी पूर्ववैमनस्यातून बिबवेवाडीत एकाचा खून

पूर्ववैमनस्यातून एकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. टोळक्याने दहशत माजवून नागरिकांना शिवीगाळ केली. या प्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.21 yrs youth murder in Bibewadi Area


विशेष प्रतिनिधी

पुणे : धुळवडीच्या दिवशी वैमनस्यातून एकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी बिबवेवाडी भागात घडली. टोळक्याने दहशत माजवून नागरिकांना शिवीगाळ केली. या प्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.21 yrs youth murder in Bibewadi Area

योगेश रामचंद्र पवार (वय २१, रा. सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी,पुणे) असे खून‌ झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनी भोंडेकर, ओंकार खाटपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पवारचा मित्र वैभव घाटूळ (वय २२, रा. टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याने या संदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धुळवडीच्या दिवशी योगेश पवार, गणराज ठाकर, वैभव घाटुळ आणि मित्रांनी इंदिरानगर परिसरातील टेकडीवर जेवण तयार केले होते. जेवण करून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पवार आणि त्याचे मित्र इंदिरानगर भागात थांबले होते.

पवार दुचाकीवरून इंदिरानगर भागातून निघाला होता. त्या वेळी अचानक त्याच्या अंगावर कोणीतरी रंग फेकला. या कारणावरून पवारने शिवीगाळ केली. आरोपी भोंडेकर, फुलारे, शिंदे, खाटपे यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून धमकावले.

गंभीर जखमी अवस्थेतील पवारला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिता हिवरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक निरीक्षक राजकुमार बरडे तपास करत आहेत.

21 yrs youth murder in Bibewadi Area

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात