पुण्यात २० सिलिंडर स्फोटांनी हादरला कात्रजचा परिसर; 2 किलोमीटर पर्यंत आवाज!!


प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील कात्रज परिसर गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरला आहे. मंगळवारी संध्याकाळी 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलिंडरचे हे स्फोट झाले असून या स्फोटांमुळे भीषण आगही लागली. स्फोट होतानाचा एक व्हिडीओ समोर आला असून ही घटना किती भीषण होती याचा अंदाज त्यातून येतो.20 cylinder blast shakes Katraj area in Pune; Sound up to 2 kilometers

या परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती देताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, २० सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेमुळे कोणी जखमी किंवा जिवितहानी झाल्याचे अद्याप माहिती नाही. मात्र, एकामागून एक झालेल्या सिलिंडर स्फोटांच्या मालिकेच्या आवाजांमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



या सिलिंडर स्फोटचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. अग्निशमन दलाची सहा वाहने आणि जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हे स्फोट इतके भीषण होते की, त्याचा आवाज तब्बल 2 किलोमीटर दूर पर्यंत ऐकू आल्याचे सांगितले जात आहे.

20 cylinder blast shakes Katraj area in Pune; Sound up to 2 kilometers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात