चंद्रपुर मधील १४ कर्मचारी निलंबित! विलीनीकरणावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल ; अनिल परब


विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या एसटीच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहेच. एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या होत्या. त्या मान्य केल्या गेल्या आहेत. मात्र विलीनीकरणासंदर्भात त्यांनी नवी मागणी केलेली आहे. त्यामुळे कर्मचार्यांचे हे अांदाेलन अद्यापही सुरूच आहे. राज्य सरकारने यावर पहिली कारवाई करत चंद्रपूरमधील 14 संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या तीन भागातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

14 employees suspended in Chandrapur The decision will be made after discussion ; Anil Parab

36 एस टी कर्मचार्यांनी नुकतीच आत्महत्या केली होती. 36 कर्मचारी हुतात्मे झाले त्यापुढे हे निलंबन शुल्क असल्याची एसटी कर्मचारयांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या निलंबनाच्या कारवाईवर त्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार समिती स्थापन होऊन विचार केला जाईल. हायकोर्टानं हा संप बेकायदेशीर आहे असे जाहीर करूनही हा संप सुरू आहे. याबाबत एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करणार आहोत असे अनिल परब यांनी नुकतेच सांगितले आहे.


रत्नागिरी : चक्क हातात बांगड्या भरून ST चालक ड्युटीवर हजर


एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीचा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कमिटीच करेल. महामंडळावर आर्थिक तणाव प्रचंड आहे. 12000 कोटींच्या संचित तोट्यात एसटी महामंडळ आहे. मी कर्मचाऱ्यांना सतत आवाहन करतोय. यशस्वी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्याचे आंदोलन बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्र्यांशी माझे याबाबत बोलणेदेखील झालेले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सामोपचाराने विचार करून निर्णय घेतला जाईल. असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले आहे.

14 employees suspended in Chandrapur The decision will be made after discussion ; Anil Parab

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था