विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : ऍन्टी सॅटेलाईट वेपन म्हणजे काय


उपग्रहांचा वापर दळणवळणांच्या साधनांसाठी होतो तसा तो हेरगिरीसाठीही होतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज काल लांब वाटणार जग अवकाशातून बघणं आता काही मीटर पर्यंत येऊन पोहचलं आहे. दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे हे बघण्यासाठी अमेरिका, रशिया ह्या राष्ट्रांनी हेरगिरी उपग्रह अवकशात सोडून पृथ्वीच्या बाहेर अंतराळातून देशांच्या सार्वभौमत्वावर एक प्रकारे अंकुश ठेवण्यास सुरवात केली.What is an anti-satellite weapon?

नंतर चीनसोबत अगदी भारताने असे उपग्रह बनवण्याचं तंत्रज्ञान स्वबळावर निर्माण केल्यावर असे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले. जमिनीवरून, पाण्यातून आणि हवेतून आपल्या घरात परिंदा पर नाही मार सकता पण अवकाशाचं काय? हा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा त्याचं उत्तर होतं ऍन्टी सॅटेलाईट वेपन किंवा ए – सॅट. ए – सॅट म्हणजे काय तर अंतराळातून आपल्या देशांच्या सीमांमध्ये अशा हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांना नेस्तनाबूत करणारं क्षेपणास्त्र! कोणी म्हणेल की जगात इतकी क्षेपणास्त्रं असताना आणि इतक्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं असताना ह्या ए-सॅट ची निर्मिती इतकी कठीण का?

तर ह्याचं उत्तर आहे ते त्याला गाठायच्या लक्ष्यामध्ये. सामान्यतः क्षेपणास्त्राला नष्ट करायची लक्ष्य ही स्थिर असतात किंवा त्यांचा वेग हा हवेतून जास्ती नसतो. त्यामुळे त्यांचा वेध घेणं सोप्पं असते. पण हेरगिरी करणारे उपग्रह अंतराळात ६०० ते १६०० किमी जमिनीपासून उंचीवर परिक्रमा करत असतात. ह्या कक्षेत त्यांचा वेग असतो ताशी जवळपास २८,००० किलोमीटर. आता विचार केला की पृथ्वीपासून ८०० किमी उंचीवर भारतावर देखरेख करणारा एक उपग्रह जात आहे. त्याला नष्ट करायचं असेल तर भारताच्या क्षेपणास्त्राला १३५० किलोमीटरचं अंतर अवघ्या ३ मिनिटाच्या आत कापावं लागेल.

यासाठी खूप उच्च प्रतीचं विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्षमता लागते. अशा हेरगिरी उपग्रहांची कक्षा, त्याचं स्थान, त्यांचा वेग हे सगळं आकाशातून मोजणारी तुमच्या देशाची यंत्रणा हवी. ह्या शिवाय जमिनीवरून प्रक्षेपित केल्यावर लक्ष्य गाठायला लागणारा वेग मिळवणारं क्षेपणास्त्र हवं. तसेच ह्या दोन्ही गोष्टींचा अचूक ताळमेळ हा काही सेंटीमीटर मध्ये जमायला लागणारं तंत्रज्ञान ही हवं. अमेरिका, रशिया, चीन नंतर असं तंत्रज्ञान असणारा भारत आज जगातील चौथा देश ठरला आहे.

What is an anti-satellite weapon?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात