एसटीचे ११ हजार कंत्राटी चालकच बनणार वाहक, कर्मचारी संपामुळे नवीन भरतीसाठी संस्थेला ठेका

वृत्तसंस्था

मुंबई : गाव तेथे एसटी अशी ख्याती असलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे खासगीकरण सुरु झाले आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाने आता एसटीत ११ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लवकरच खासगी संस्थेला ठेका दिला आहे. 11,000 contract drivers of ST will become conductors, contract for new recruitment due to staff strike

चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.



संप मिटत नसल्याने एसटीत यापूर्वी १,७५० कंत्राटी चालकांची भरती केली आहे. आता आणखी ११ हजार चालकांची भरती करण्यात येईल. वाहकही मोठय़ा संख्येने संपात सामील आहेत. मग वाहकांची भरती का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर उपाय म्हणून सध्या चालकच वाहक बनून जबाबदारी पार पडणार आहेत. सध्या एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८१ हजार ६८३ असून त्यातील ३१ हजार २३४ कर्मचारीच कामावर आहेत.

11,000 contract drivers of ST will become conductors, contract for new recruitment due to staff strike

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात