प्रतिनिधी
मुंबई : 1034 कोटींच्या घोटाळ्यामुळे आणि संजय राऊतांच्या त्यातल्या सहभागामुळे चर्चेत आलेली पत्राचाळ मुंबईतील गोरेगावात आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन इतर 3000 फ्लॅट एमएचडीएला देणार होती. प्रत्यक्षात चाळीतील भाडेकरूंना मिळाल्या सदनिका मिळाल्या नाहीत. 1034 Crore Mail Scam What exactly??, read in detail
पत्राचाळ घोटाळा तपशील
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2015 मध्ये गुरु आशिष कंपनीच्या फ्लॅट्सना ऑक्युपेशनल सर्टिफिकेट दिली नव्हती. पत्राचाळ घोटाळा बाहेर आल्यामुळे फडणवीस सरकारने किंवा हा निर्णय घेतला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारने 2019 मध्ये संबंधित कंपनीच्या फ्लॅट्सना ऑक्युपेशनल सर्टिफिकेट देऊन टाकले.
एकूण हा घोटाळा तब्बल 1034 कोटी रुपयांचा आहे.
गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक डीएचएफएलचा राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच संदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले होते.
ईडीने जप्त केलेत 9 फ्लॉट
याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे.
मनी लॉण्ड्रींग कायदा 2022 अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई केली आहे.
ही संपत्ती ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’चे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर, सफाळे, पडघा येथील जमिनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत (संजय राऊत यांच्या पत्नी) यांचा फ्लॅट आणि अलिबामधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर (सुजित पाटकर यांच्या पत्नी) या दोघींची एकत्रित मालकी असणाऱ्या जमिनीचा समावेश आहे.
अलिबागमध्ये भूखंड खरेदी केलेल्या भूखंडांची किंमत साधारणतः 60 लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App