एका व्यवसायिकाला बिटकाॅईन या क्रिप्टाेकरन्सीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्याच्याकडून १९ लाख ७० हजार रुपये घेऊन त्याला दीड बीटकाॅईन देण्याचे अमिष दाखवून त्याची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
विशेष प्रतिनिधी
पुणे-एका व्यवसायिकाला बिटकाॅईन या क्रिप्टाेकरन्सीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्याच्याकडून १९ लाख ७० हजार रुपये घेऊन त्याला दीड बीटकाॅईन देण्याचे अमिष दाखवून त्याची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात कुलदीप नारायण कदम (वय-३६,रा.शनिवार पेठ,पुणे) यांनी तक्रार दिल्यानंतर पाच आराेपीं विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Businessman Investment in Bitcoin and cheated by Mumbai five persons
रंजित जरनैल सिंह (वय-३७,रा.मिरा भाईंदर,ठाणे), शब्बीर शेख (४१,रा.मिरा राेड,मुंबई), सुजाॅय पाॅल (रा.हांडेवाडी,पुणे), मंगेश कदम (रा.गाेखलेनगर,पुणे), मुकुल (रा.मुंबई) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे अाहे. कुलदीप कदम यांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्राेटेक्टर रिअॅलिटी या आराेपींच्या ऑफिस मद्ये गुंतवणुकीबाबत संर्पक केला हाेता.
त्यानंतर त्यंचा विश्वास संपादन करुन आराेपींनी त्यांना दिड बीटकाॅईनचे १९ लाख ७० हजार ८८६ रुपये रंजित सिंह यांचे बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले. मात्र, ठरल्याप्रमाणे बिटकाॅइन न देता तसेच त्याबाबत तक्रारदार यांनी विचारणा केली असता त्यांना आराेपींनी फाेन करुन जीवे मारण्याची धमकी देवून आर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पाेलीस करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App