कोरोनाने २६ पोलिसांचे घेतले बळी, वर्षभरात एकूण ३९० जणांचा मृत्यू ; लॉकडाऊनमधील कार्य कौतुकास्पद

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना संसर्ग झालेल्या २६ अधिकारी, अमलदारांचा गेल्या दोन आठवड्यांत मृत्यू झाल्याची माहिती राज्य पोलिस मुख्यालयाने दिली. गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत ३९० पोलिसांचा कोरोनाने बळी गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी जीवाची बाजी लावून केलेले काम कौतुकास्पद ठरले होते. Corona killed 26 policemen



संसर्ग पसरू नये यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. त्यातच दुसरी लाट थोपवण्यासाठी लादलेल्या कठोर निर्बंधांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आता पोलिसांवर आली. त्यामुळे पोलिस दलात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

वर्षभरात ३४ हजार ५८७ अधिकारी, अंमलदार बाधित झाले. ३ हजार ७०० जण उपचार घेत आहेत. तर मुंबई पोलिस दलातील ८ हजार ३७२ अधिकारी, अंमलदार यांना कोरोना झाला. त्यापैकी ७ हजार ५९८ जणांनी कोरोनावर मात केली. आता बहुसंख्य अधिकारी कामावर परतले आहेत.

Corona killed 26 policemen

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात