पुणे तेथे काय उणे! पुणेकर तरुणांच्या स्टार्टअपला केंद्र सरकारची मान्यता ; बनवणार ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या देशात आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणांहून लोकं वैद्यकीय उपकरणं सरकारी यंत्रणांसाठी उपलब्ध करुन देत आहेत.पुणेकर तरूणांनी तयार केलेले हे मशीन देशासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. PUNE : Central Government approves Pune-based youth startups; Oxygen concentrator machine to be made


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोना संक्रमित व्यक्तीला सर्वाधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. तथापि, देशात ऑक्सिजनची कमतरता देखील आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आयआयटी कानपूरच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये नोंदणीकृत इंदिमा फायबर या कंपनीने सीडी ऑक्सी या पहिल्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची निर्मिती केली. त्यांनंतर मध्य प्रदेश सरकारकडून २०० हून अधिक कॉन्सनट्रेटर तयार करण्याचे ऑर्डर कंपनीला प्राप्त झाली.आता पंतप्रधान कार्यालय आणि Department of Science and Technology ने ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बनवणाऱ्या पुणेकर तरुणांच्या स्टार्टअपला उत्पादनाची परवानगी दिली आहे.

कंपनीचे संचालक डॉ सुनील ढोले यांनी सांगितले की त्यांनी आयआयटी कानपूर येथे हे नाविन्यपूर्ण काम संदीप पाटील आणि तुषार वाघ यांच्या सहकार्याने केले आहे.त्यांच्या मते जीएसटीसह याची किंमत ८५००० रुपये आहे.आयआयटी IIT कानपूरमधून शिक्षण घेतलेल्या तीन पुणेकरांनी भारतीय लष्करासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बनवण्याच्या प्रकल्पाला (ChemDist Membrane Systems Pvt Ltd) सुरुवात केली. सुनील ढोले, संदीप पाटील आणि तुषार वाघ अशी या तरुणांची नावं आहेत.

“गेल्या वर्षभरापासून आम्ही या प्रकल्पावर काम करत आहोत. मध्यंतरी भारत आणि चीन यांच्यात सीमेवर जो काही तणाव सुरु होता त्यावेळी आम्ही बनवलेल्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतू सध्याच्या परिस्थितीत जेव्हा देशात सर्व ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासायला लागली त्यावेळी आम्ही हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बनवण्याचा निर्णय घेतला.
हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बनवण्यामागचं तंत्रज्ञान आम्हाला माहिती होतं त्यामुळे दहा दिवसांमध्ये आम्ही ही गोष्ट करु शकलो.” डॉ. सुनील ढोले यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली.

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर काम कसं करतं?

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर हे एक पोर्टेबल मशीन आहे. ज्याच्या मदतीने रुग्णांसाठी हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर प्रेशर स्वेंग ऑबर्झव्हेशन टेक्नोलॉजीच्या वापर करतं. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे अशा जागी वापरलं जातं जिथे द्रव (Liquid) ऑक्सिजन किंवा प्रेश्चरायईज्ड ऑक्सिजनचा वापर हा धोकादायक ठरु शकतो.

घरात किंवा छोट्या क्लिनिकमध्ये याचा वापर करताना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर हे हवेतून नायट्रोजन वेगळं करतं आणि ऑक्सिजनच्या अधिक असणाऱ्या वायूला बाहेर काढतं. ज्याचा वापर ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण करु शकतात. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर हे औद्योगिक प्रक्रियांमध्ये देखील ऑक्सिजनचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे. जिथे यांना ऑक्सिजन गॅस जनरेटर किंवा ऑक्सिजन जनरेशन प्लांट म्हणून ओळखलं जातं.

दरम्यानच्या काळात या तिन्ही मित्रांच्या कंपनीला तेलंगणा, मध्य प्रदेश आणि काही खासगी हॉस्पिटल्सकडूनही ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर च्या ऑर्डर मिळायला सुरुवात झाली आहे. ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही ८० ते ९० पर्यंत घसरली आहे त्यांच्यासाठी आपण बनवलेले ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असल्याची माहिती सुनील ढोले आणि संदीप पाटील यांनी दिली.

सध्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बनवण्यासाठीचे अनेक भाग हे तरुण परदेशातून मागवत आहेत. परंतू येणाऱ्या काळात या भागांचं उत्पादनही भारतात करण्याचा विचार या तरुणांचा आहे.

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही आम्ही भारतातच तयार केला तर याची किंमतही कमी होईल. ज्यामुळे सामान्य लोकांना हे खरेदी करणं सहज शक्य होईल असं मत या तिन्ही मित्रांनी व्यक्त केलं आहे.

 

PUNE : Central Government approves Pune-based youth startups; Oxygen concentrator machine to be made

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण