वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात मंगळवारी सकाळी बिबट्याने एका तरुणावर हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे भागात दहशत पसरली आहे. बिबट्या नागरी वस्तीत कसा काय आला ? याचे गूढ वाढले आहे. हडपसर भागातील साडेसतरा नळी येथे हा हल्ला झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी भागात बिबट्या दिसून आला होता. Young man injured in leopard attack in Hadapsar; Panic spread in urban areas
संभाजी बबन आटोळे ( रा. गोसावी वस्ती), असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सीरम इन्स्टिट्यूट मागे आलेल्या गोसावी वस्ती येथे आटोळे वर बिबट्याने पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. आटोळेच्या डाव्या बाजूला बिबट्याने पंजा मारला. त्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संभाजी आटोळे आणि त्याचा मित्र अमोल लोंढे हे मॉर्निंग वॉकला जात होते. तेव्हा गवतात लपलेल्या बिबट्याने झेप घेतली आणि जखमी केले. त्यांनतर नागरिक घटनास्थळी धावले. हल्ल्यानंतर बिबट्या हा परिसरातील पडक्या घरात किंवा झुडपात लपल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आमदार चेतन तुपे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या हल्ल्याची चर्चा सुरु आहे. बिबट्याची दहशत साडेसतरा नळी, गावदेवी आणि गोसावी वस्ती येथे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App