प्रतिनिधी
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाची पोस्टर्स लावली आहेत. अमोल मिटकरी यांनी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…, असे ट्विट केले. You cannot become Chief Minister by putting up posters, you need 145 MLAs
या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री हसनमुश्री यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना टोला हाणला आहे. नुसती पोस्टर्स लावून मुख्यमंत्री होता येत नाही. त्यासाठी 145 आमदारांचे बहुमत लागते पण नियतीच्या मनात काय असेल ते सांगता येत नाही, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले.
हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर त्यांना तपास यंत्रणांची भीती का वाटतेय?- भाजपा
मुश्रीफ यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना परखड बोल सुनावले. त्यामुळे राष्ट्रवादीत वेगळा सूर उमटतोय का??, असा संशय तयार झाला आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हाच हसन मुश्रीफ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या कागल मतदार संघात समरजीत सिंह घाटगे आणि मुश्रीफ असा संघर्ष अधिक तीव्र झाला. हसन मुश्रीफ सध्या आक्रमक मूडमध्ये आहेत. त्यांना त्यांच्यावरच्या ईडी केसेस मुळे त्रास होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर अजितदादांबरोबर शपथ घेऊनही ते राष्ट्रवादीत आणखी कुठला वेगळा सुरू उमटवतात का??, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App