विशेष प्रतिनिधी
बारामती : ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर रोजी दौंड तालुक्यातील पाटस येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना नोटीस बजावली आहे. मोर्चाचा मार्ग, सहभागी होणाऱ्या वाहनांची संख्या तसेच आंदोलकांची संभाव्य संख्या याबाबतची माहिती पोलिसांना लेखी स्वरूपात देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लक्ष्मण हाके यांनी आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानाची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या आंदोलनाला अद्याप आझाद मैदानाची परवानगी मिळालेली नसल्याचे पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास पोलिसांची हरकत नसली, तरी आंदोलनाचे स्वरूप आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या याची माहिती प्रशासनाला असणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मोर्चासाठी किती वाहने येणार आहेत, किती नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे आणि मोर्चाचा नेमका मार्ग कोणता असेल, याची माहिती तातडीने पोलिसांना देण्याच्या सूचना नोटीसमधून करण्यात आल्या आहेत. या माहितीच्या आधारे कायदा व सुव्यवस्था, वाहतूक तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करता येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, यवत पोलिसांच्या नोटीसीनंतर लक्ष्मण हाके यांनी पोलिस प्रशासनाला आवश्यक माहिती देण्याची तयारी दर्शवली आहे. मोर्चासंदर्भातील माहिती उद्या, ३१ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत पोलिसांना कळविण्यात येईल, असे आश्वासन हाके यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App