समाजासाठी आदर्श, पण पतीच्या छळाने खचली; संगीताने मृत्यूला कवटाळले

विशेष प्रतिनिधी

बारामती : पिढ्यान्‌पिढ्या सामाजिक उपेक्षेचा सामना करणाऱ्या पारधी समाजातून शिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी आदर्श ठरलेल्या संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) यांचा दुर्दैवी अंत झाला. पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून त्यांनी डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी पती किरण भानुदास भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना राजेंद्र काळे (रा. करंजे, ता. बारामती ) यांनी तक्रार दिली आहे. संगीता यांचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे, तर सासर सुपे येथे आहे. सन २००३ मध्ये त्यांचा विवाह किरण भोसले याच्याशी झाला होता. विवाहानंतरही संगीता यांनी आपल्या आयुष्याची दिशा बदलत पोलीस दलात प्रवेश केला. स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहत त्यांनी पारधी समाजातील अनेक मुलींसमोर शिक्षण आणि सरकारी नोकरीचे उदाहरण ठेवले.



 

नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार, पत्नी सावळी असल्याच्या कारणावरून पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यातून मानसिक त्रास व मारहाण केली जात असल्याचा आरोप आहे. तसेच घरातील वस्तूंच्या खरेदीवरूनही दोघांमध्ये वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून संगीता यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संगीता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सासरच्या मंडळींवरही पैशाची मागणी आणि छळाचे आरोप करण्यात आले आहेत. इतर आरोपींवरही कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यासमोर आणले होते. पोलिसांच्या आश्वासनानंतर पार्थिवावर सोमेश्वर मंदिर परिसरातील शेतात अंत्यविधी करण्यात आला.

एका संगीतेच्या यशातून अनेक मुली पुढे आल्या…

संगीता यांनी पोलीस दलात प्रवेश केल्यानंतर परिसरातील पारधी समाजातील पाच-सहा मुलींनी त्यांना आदर्श मानून पोलीस भरतीची वाट धरली. विशेष म्हणजे, त्यांनी पती किरण यांनाही पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर तेही पोलीस दलात दाखल झाले.

A role model for society, yet broken by her husband’s abuse; Sangeeta embraced death

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात