Yashwantrao chavan जसा गुरु, तसा शिष्य; कारकिर्दीच्या अखेरीस राजकीय शोकांतिकेचे शल्य!!

Yashwantrao chavan

Yashwantrao chavan  जसा गुरु, तसा शिष्य; कारकिर्दीच्या अखेरीस राजकीय शोकांतिकेचे शल्य!!, असं म्हणायची वेळ कालच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दारुण पराभवानंतर आली आहे. त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या आदल्याच दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आणि शरद पवार आज यशवंतरावांच्या समाधीस्थळी कराडला दर्शनासाठी येऊन पोहोचले. हा एक गुरु – शिष्य नात्यामधला विचित्र योगायोग घडला. Yashwantrao chavan and sharad pawar political tragedy

खुद्द यशवंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द अखेरीस राजकीय निराशेतच गेली. 1980 ते 1985 या कालावधीत त्यांचे सगळे राजकीय आडाखे चुकले. इंदिरा गांधींसारख्या बलाढ्य नेत्याला ते आव्हान द्यायला गेले, पण दारूण पराभूत होत ते महाराष्ट्रात परतून आले. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाण – रेड्डी काँग्रेसचे महाराष्ट्रातून ते एकमेव खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांचे बाकीचे सगळे उमेदवार पडले होते. सातारा मतदारसंघातून यशवंतरावांना निवडून येण्यासाठी आयुष्यभर विरोध केलेल्या जनसंघाची “आतून” मदत घ्यावी लागली होती.

यशवंतराव लोकसभेवर निवडून आले खरे, पण त्यांना विरोधी बाकांवर एकाकी बसावे लागले होते. यशवंतरावांच्या राजकारणाची अशी काही शोकांतिका झाली की, कोणाही पोराटोराने उठून त्यांचे टिंगल करावी, असे त्या वेळचे ज्येष्ठ पत्रकार ग. वा. बेहरे यांनी सोबत मध्ये लिहिले होते. यशवंतरावांना इंदिरा गांधींनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, हे खरे, पण त्यासाठी त्यांना तब्बल वर्ष – दीड वर्ष वाट पाहायला लावली हे देखील जास्त खरे ठरले होते. केंद्रात गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही सगळी खाती सांभाळणारी ते एकमेव मंत्री होते. पण कारकिर्दीच्या अखेरीस यशवंतराव फक्त आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, ते देखील इंदिरा कृपेमुळे!!

शरद पवारांची आजची अवस्था यशवंतरावांपेक्षा फारशी वेगळी नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने माध्यमनिर्मित चाणक्याची अशी काही अवस्था करून ठेवली आहे की, त्यांना आता धड ना काँग्रेस मध्ये जाता येणार आणि काँग्रेसमध्ये ते गेले तरी, ना त्यांचा काही उपयोग होणार!! आणि काँग्रेस तरी शरद पवारांना घेऊन महाराष्ट्रात इथून पुढे काय दिवे लावणार??, हा देखील सवालच आहे.


Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया


– आत्मविश्वासाचे अहंकारात रूपांतर

आपला पक्ष फुटला आणि त्यातले कितीही आमदार निघून गेले तरी आपण त्यांच्या जागी दुसरी माणसे निवडून आणू शकतो असा शरद पवारांना आत्मविश्वास होता तसा त्यांच्या गाठीशी राजकीय अनुभव देखील होता परंतु तो अनुभव महाराष्ट्राच्या जनतेने 2024 मध्ये फारच तोकडा ठरविला. एरवी महाराष्ट्राची नाडी समजणाऱ्या, महाराष्ट्राची राजकीय स्पंदने इतर कोणाही पेक्षा जास्त आकलन करणाऱ्या आणि पंतप्रधान मोदींनी राजकीय हवामान तज्ञ म्हणून गौरवलेल्या शरद पवारांना 2024 चा मात्र बिलकुल अंदाज आला नाही. आपण कुठल्याही माणसांना निवडून आणू शकतो आणि पाडू शकतो, हा राजकीय आत्मविश्वास प्रत्यक्षात पवारांचा अहंकार आणि दर्प होता, हे 2024 च्या निवडणुकांनी सिद्ध केले आणि त्यांना फक्त 10 आमदारांच्या नेते पदावर आणून ठेवले.

गुरुच्या कारकिर्दीची अखेर अशीच राजकीय शोकांतिकेत गेली. त्यावेळी देखील गुरुची भलामण महाराष्ट्रातली माध्यमे “थोरले साहेब” म्हणून अशीच करत होती. गोविंद तळवळकरांसारखे संपादक इतरांवर तलवारी सारखी लेखणी चालवत असताना यशवंतरावांवर लिहिताना मात्र ती तलवार म्यान करून ठेवत असत. पण तरीही त्यावेळची महाराष्ट्रातील माध्यमे यशवंतरावांची राजकीय कारकीर्दीतली अखेरची शोकांतिका टाळू शकली नाहीत.

आज मराठी माध्यमे यशवंतराव यांच्या शिष्याची अशीच भलामण करतात. त्यांना “चाणक्य”, “वस्ताद” असे संबोधन त्यांच्याच वतीने “खेळ्या” करतात आणि “डाव” टाकतात. पण म्हणून मराठी माध्यमांनी पवारांच्या कारकिर्दीची अखेरची शोकांतिका टाळली, असे म्हणता येणार नाही. कारण माध्यमांनी त्यांच्या अंगावर चढवलेली चाणक्य पदाची झूल महाराष्ट्राच्या जनतेनेच उतरवून ठेवली आहे!!

Yashwantrao chavan and sharad pawar political tragedy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात