वृत्तसंस्था
अमरावती : राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बालकांच्या कुपोषणाच्या मुद्द्यावर केला. याबाबतची तक्रार त्यांनी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली आहे. Yashomati Thakur commits Rs 800 crore scam, serious allegations by Navneet Rana; Complaint to Union Minister on the issue of child malnutrition
यशोमती ठाकूर या अमरावतीच्या पालकमंत्री सुद्धा आहेत. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना सरकारतर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार आणि अन्य आवश्यक वस्तू मिळाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात मेळघाटात ४९ नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे, अशी तक्रार राणा यांनी इराणी यांच्याकडे केली.
नवनीत राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या तसंच महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी आणि व्यंकटेश या कंपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली आहे आणि कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम देण्यात आलं आहे. हे काम व्यवस्थित झाले नाही. त्यामुळे मेळघाटातील बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. याला यशोमती ठाकूर जबाबदार असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. परंतु ठाकूर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App