विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आमच्या नियमबाह्य निलंबन प्रकरणाचा सरकारकडून अहवाल मागवून घ्यावा, अशी विनंती केली , असे अभिमन्यू पवार यांनी सांगितले. तसेच लोक्षाहीविरोधी वर्तन करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात लेखी तक्रार राज्यपालांकडे केली असल्याचे ते म्हणाले. Written Complaint Against Thackeray Government to Governor: Abhimanyu pawar
तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी १२ आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेले, अशी माहिती पवार यांनी दिली.
ते म्हणाले, निलंबित १२ आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना असे सांगितले की, योग्य ती शहानिशा करून आमच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची विनंती केली. लोकशाही विरोधी काम करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात लेखी तक्रार दिली आहे.
पवार म्हणाले, ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवला म्हणून आघाडी सरकारने खोटे कथन करून आम्हाला निलंबित केलं आहे. मिळालेले अधिकार चुकीच्या पद्धतीनं वापरणाऱ्या सरकारने ‘आपल्या सगळ्यांच्या वरती सर्वोच्च असे जनतेचे न्यायालय आहे’ याचा फक्त विसर पडू देऊ नये.
महामहिम राज्यपाल मा श्री @BSKoshyari जी यांची भेट घेऊन आमच्या नियमबाह्य निलंबन प्रकरणाचा सरकारकडून अहवाल मागवून, योग्य ती शहानिशा करून आमच्या संवैधानिक अधिकारांचे संरक्षण करण्याची विनंती केली.#MahaNapasAghadi @DrSanjayKute pic.twitter.com/lwkHvGpVPs — Abhimanyu Pawar (Modi Ka Parivar) (@AbhiPawarBJP) July 5, 2021
महामहिम राज्यपाल मा श्री @BSKoshyari जी यांची भेट घेऊन आमच्या नियमबाह्य निलंबन प्रकरणाचा सरकारकडून अहवाल मागवून, योग्य ती शहानिशा करून आमच्या संवैधानिक अधिकारांचे संरक्षण करण्याची विनंती केली.#MahaNapasAghadi @DrSanjayKute pic.twitter.com/lwkHvGpVPs
— Abhimanyu Pawar (Modi Ka Parivar) (@AbhiPawarBJP) July 5, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App