WORLD RADIO DAY:’बिनाका गीतमाला’ ते ‘मन की बात’…. विश्वास- काल – आज- उद्या …रेडिओ माहिती आणि मनोरंजनाचं शक्तिशाली साधन

  • 23 जुलै 1927 रोजी मुंबई आणि कलकत्ता येथे ऑल इंडिया रेडिओ नावाने दोन केंद्र सुरु झाली.
  • 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण .
  • 8 जून 1936 मध्ये ‘ऑल इंडीया रेडीओ’ असे नामकरण करण्यात आले.

मन की बात’ने लोकप्रियतेत भर

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओद्वारे जनसंवादाची क्षमता ओळखत ३ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर रेडिओच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. दर महिन्यात ते रेडिओवरून नागरिकांशी संवाद साधत असतात WORLD RADIO DAY: From ‘Binaka Geetmala’ to ‘Mann Ki Baat’ …. Faith – Yesterday – Today – Tomorrow … Powerful tool of radio information and entertainment


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकेकाळी रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग होता. माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता.आज आपण टेक्नॉलॉजिमध्ये कितीही पुढे गेलो असलो

आणि मनोरंजनाच्या साधनामध्ये वैविध्यता आणली तरी ‘रेडिओ’ या श्राव्य माध्यमाची जी जादू आणि विश्वासाहर्ता आहे ती आजही टिकून आहे.रेडिओ हे संवादाचे जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून आजही पाहीले जाते. आज जागतिक रेडीओ दिन. पाहूया जागतिक रेडीओ दिनाचा इतिहास.



अशी झाली ‘जागतिक रेडिओ दिवसा’ची सुरुवात

19व्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन शोधक आणि विद्युत अभियंता गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला. प्रसारकांमध्ये रेडिओचे जाळे मजबूत करण्यासाठी तसेच रेडिओविषयी विविध माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

आज रेडिओ हे सर्वात जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. 1945 मध्ये आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिले प्रसारण झाले होते. त्यामुळे हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. स्पेन रेडिओ अकादमी’ने 2010 मध्ये ‘जागतिक रेडिओ दिवस’ साजरा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर युनेस्कोच्या 67 व्या सत्रात 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयाला संयुक्त राष्ट्रसंघाने 14 जानेवारी 2013 रोजी मान्यता दिली. दरवर्षी युनेस्कोद्वारे जगभरातील रेडिओ प्रसारक आणि संघटनांनाच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

World Radio Day जागतिक रेडिओ दिन, काय आहे २०२२ ची थीम

संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी एक थीम ठरवते. २०२२ यावर्षीची थीम ही ‘Radio and Trust’ अशी ठेवली आहे. तर २०२१ सालची जागतिक रेडिओची थीम ही ‘New World, New Radio’ होती. रेडीओने काळानुसार आपल्या माहिती प्रसारात लवचिकता ठेवली आहे. आणि हेही तितकेच खर आहे की रेडिओने आपली विश्वासाहर्ताही जपली आहे.

हा दिवस जगात २०१२ पासून साजरा करण्यास सुरूवात झाली. रेडिओ असे माध्यम आहे की जे लोकांना वेगवेगळ्या स्वरूपाची विश्वासपूर्ण माहीती देते. खासकरून गाव, वाड्या, वस्त्या जिथे माहीती आणि मनोरंजनाची साधने पोहोचत नाही. अशा ठिकाणी रेडिओची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

सध्याच्या घडीला भारतात सुमारे ४१५ सामुदायिक प्रसारण केंद्रे आहेत. (Cammunitry Radio) देशात १९२३ मध्ये रेडिओ ब्रॉडकास्टला सुरूवात झाली. १९३६ साली भारतात सरकारी ‘इम्पेरियल रेडीओ ब्रॉडकास्ट’ सुरूवात झाली. स्वातंत्र्यानंतर १९५७ सालापासून आकाशवाणी ‘ऑल इंडीया रेडिओ’ म्हणून ओळखू लागले. हे नाव प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते.

(म्हैसूर संस्थानाने रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते) २००१ पासून भारतात खासगी रेडिओ स्टेशनलाही सुरुवात झाली. इंटरनेटच्या जगात माहीती आणि मनोरंजनाचा मारा होत असला तरी रेडिओ आजही आपली जादू टिकवून आहे.मार्कोनीने १८९५ साली बनविलेल्या रेडीओने संवाद क्रांतीत अमुलाग्र बदल घडवून आणला. पूर्वीच्या AM वरुन ते FM रेडिओचा प्रवास हा थक्क करणारा आहे.

‘बिनाका गीतमाला’ ते ‘मन की बात’

सत्तरच्या दशकातील एक गोष्ट जिने आजच्या दशकालाही क्रेझ लावली आहे ती म्हणजे ‘बिनाका गीतमाला’. १९५२ सालापासून रेडिओ सिलोनवर ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम सुरू झाला. ‘बहनों और भाईयों ‘ हा आवाज रेडिओमधून आला की दर बुधवारी लोक सरसावून बसायचे. कारण बिनाका गीतमाला सुरु व्हायची. प्रत्येक बुधवारी रात्री ८ वाजता रस्ते निर्मनुष्य असायचे. सारा देश त्यावेळी फक्त आणि फक्त बिनाका ऐकत असायचा. अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय झाला.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं.

त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात. जनतेशी जुळणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश..

WORLD RADIO DAY: From ‘Binaka Geetmala’ to ‘Mann Ki Baat’ …. Faith – Yesterday – Today – Tomorrow … Powerful tool of radio information and entertainment

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात