इंदू मिलच्या परिसरात बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर; एकनाथ शिंदेंकडून कामाची पाहणी

Indu Mill

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दादरच्या इंदू मिलच्या परिसरात राज्यघटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात तयार होत असलेल्या इंदू मिल स्मारकाची पाहणी करून कामाची प्रगती जाणून घेतली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हेदेखील सोबत होते.

याप्रसंगी इंदू मिल स्मारकाच्या कामाबद्दल अधिकाऱ्यांकडून तपशीलवार जाणून घेतले. या सोबतच या स्मारकात तयार होत असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे काम आता प्रगतीपथावर असून ते कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे तेही यावेळी समजून घेतले.



याप्रसंगी मंत्री संजय शिरसाट, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सह- मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे आणि एमएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

इंदू मिल मधले बाबासाहेबांचे स्मारक पुढील वर्षापर्यंत पूर्ण करून त्याच वर्षी लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Work on Babasaheb’s memorial in the Indu Mill area is in progress; Eknath Shinde inspects the work

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात