अनैतिक संबंधातून महिलेने विवाहित प्रियकराचा लॉजवर नेऊन ओढणीने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी चिंचवड स्टेशनजवळील व्हाइट हाऊस लॉजिंग आणि बोर्डिंगच्या रूममध्ये घडली.
विशेष प्रतिनिधी
पुणे : अनैतिक संबंधातून महिलेने विवाहित प्रियकराचा लॉजवर नेऊन ओढणीने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी चिंचवड स्टेशनजवळील व्हाइट हाऊस लॉजिंग आणि बोर्डिंगच्या रूममध्ये घडली. Woman kills married boyfriend over immoral relationship, takes him to lodge and strangles him
पैगंबर गुलाब मुजावर (वय 35 रा. एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैगंबर आणि आरोपी महिलेमध्ये प्रेम संबंध होते. ते दोघे एकाच दुकानात काम करत होते. त्यांच्यामध्ये एक वर्षापासून अनैतिक संबंध होते.
पैगंबर याने काही दिवसांपासून या महिलेला भेटणे बंद केले होते. तिच्यासोबत लग्न करण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे या महिलेच्या मनामध्ये राग होता.यावरून या दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते. या महिलेने शुक्रवारी त्याला व्हाईट हाऊस लॉजवर नेले. येथे या महिलेने ओढणीच्या सहाय्याने पैगंबर यांचा गळा आवळून खून केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App