विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता किरण माने प्रकरणात राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केला असून आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मालिकेच्या निर्मात्यांना जाब विचारला आहे.Woman commission’s intervain in Kiran Mane case Rupali Chakankar demand explanation
कलावंतांनी वैचारिक राजकीय भुमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारी आहे. तरी याबाबत लेखी खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कार्यालयास करावा, अशी सुचना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या निर्मात्यांना, पॅनोरामा इंटरटेनमेंटला करण्यात आली.
ललीता किरण माने यांचा तक्रार अर्ज महिला आयोग कार्यालयाला मिळाला. त्यानंतर आयोगाच्या चाकणकर यांनी संबंधित निर्मात्यांना पत्र पाठवून खुलासा मागितला आहे.
अभिनेते, पुरोगामी विचारवंत व लेखकही आहेत. ते विविध माध्यमातून त्यांची वैचारिक भूमिका लिहित मांडत असतात त्यामुळेच त्यांना कोणतीही पूर्व संधी वा सूचना न देता निर्मात्यांनी मालिकेतून काढून टाकले आहे. निर्मात्यांच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. त्याचबरोबर कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे,असे पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App