
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता किरण माने प्रकरणात राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केला असून आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मालिकेच्या निर्मात्यांना जाब विचारला आहे.Woman commission’s intervain in Kiran Mane case Rupali Chakankar demand explanation
कलावंतांनी वैचारिक राजकीय भुमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारी आहे. तरी याबाबत लेखी खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कार्यालयास करावा, अशी सुचना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या निर्मात्यांना, पॅनोरामा इंटरटेनमेंटला करण्यात आली.
ललीता किरण माने यांचा तक्रार अर्ज महिला आयोग कार्यालयाला मिळाला. त्यानंतर आयोगाच्या चाकणकर यांनी संबंधित निर्मात्यांना पत्र पाठवून खुलासा मागितला आहे.
अभिनेते, पुरोगामी विचारवंत व लेखकही आहेत. ते विविध माध्यमातून त्यांची वैचारिक भूमिका लिहित मांडत असतात त्यामुळेच त्यांना कोणतीही पूर्व संधी वा सूचना न देता निर्मात्यांनी मालिकेतून काढून टाकले आहे. निर्मात्यांच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. त्याचबरोबर कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे,असे पत्रात म्हटले आहे.
Woman commission’s intervain in Kiran Mane case Rupali Chakankar demand explanation
महत्त्वाच्या बातम्या
- नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना सुनावले
- अभिनेता सोनू सूदच्या माध्यमातून कॉँग्रेसचा नवज्योत सिंग सिध्दूवर निशाणा, चरणजिसिंग चन्नीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे दिले संकेत
- टेरेसवर द्राक्ष बागेचा प्रयोग ; ४५० घड द्राक्षांनी लगडले उरुळी कांचन येथील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
- स्वत;ची ओळख मिळविण्यापूर्वी रजनीकांतचा जावई म्हणून ओळख असलेल्या अभिनेता धनुषने घटस्फोट घेतला आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्यापासून आपण घटस्फोट घेत असल्याची पोस्ट केली आहे.
Array