राज्यसभेसाठी संभाजीराजे यांची अपक्ष उमेदवारी ते माघार; सगळे राजकारण फडणवीसांवर शेकवण्यासाठी वार!! अशी महाराष्ट्रातली आजची स्थिती आहे. Withdrawal of Sambhaji Raje’s candidature; A ploy to burn all politics on Fadnavis
संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारी करण्यापासून ते माघार घेण्यापर्यंत जेवढे म्हणून महाराष्ट्रात राजकारण घडले, तेवढे प्रत्यक्ष राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडून येतानाही घडत नाही. यात अनेक वळसे आणि वळणे आली आहेत.
स्वतः संभाजी राजे यांनी अपक्ष म्हणून जाहीर केलेली उमेदवारी, शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीची जादाची मते देण्याचे दिलेले आश्वासन, त्यानंतर शिवसेनेची पक्ष प्रवेश करून उमेदवारी घेण्याची ऑफर, परंतु संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम आणि अखेरीस मतांची बेगमी झाली नाही म्हणून त्यांनी घेतलेली माघार… या सगळ्या राजकारणाला संभाजीराजे यांचे पिताश्री कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी आज वेगळाच ट्विस्ट दिला आहे.
संभाजीराजे हे 2009 नंतर स्वतंत्रपणे राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतात. त्यांनी माझ्याशी विचार विनिमय केलेला नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी परस्पर जाहीर केली असावी, असे वक्तव्य करून शाहू महाराजांनी एक प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना क्लीन चिट दिली आहे.
अशी क्लीन चीट दिल्यानंतर खुद्द संभाजीराजे यांनी देखील आपण पत्रकार परिषदेत जे बोललो ते शिवछत्रपतींना स्मरून सत्य बोललो. पण आपले पिताश्री जे काही बोलले त्याविषयी मला काही बोलायचे नाही, असे ट्विट केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला या भूमिकेवर संभाजीराजे ठाम आहेत असे स्पष्ट झाले. यातून एक प्रकारे पितापुत्रांमधले राजकीय मतभेद जनतेसमोर आले आहेत.
तिसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानले आणि त्यांनी देखील आपला होरा देवेंद्र फडणवीसांकडे वळवला. स्वतः शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरला म्हणून संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असावी, असे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संशयाची सुई फिरवली होतीच. त्यावर संजय राऊत यांनी शाहू महाराजांचे आभार मानून एक प्रकारे मोहर उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाहू महाराजांनी क्लीन चीट दिल्यानंतर संजय राऊत यांना विशेष जोर चढला असे दिसले.
या सर्व राजकारणात संभाजी राजे यांची अपक्ष उमेदवारी मागची नेमकी प्रेरणा कोण??, याचे उत्तर स्वतः संभाजी राजे, छत्रपती शाहू महाराज आणि संजय राऊत यांनी या तिघांनीही दिले नाही.
– प्रवीण दरेकर यांचे पवारांकडे बोट
पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आपल्याकडची जादा मते संभाजीराजांना देण्याचे जाहीर करून त्यांना शिवसेनेकडे पाठवले आणि शिवसेनेला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना पेचात पकडली गेली नाही आणि संभाजीराजांना अखेरीस माघार घ्यावी लागली असावी. यात देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही आहे, असे उत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.
पण संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीच्या निमित्ताने सर्व राजकारण “फिरून – फिरून भोपळे चौकात” म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेकण्याचा प्रयत्न झाला हे यातून दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App