वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदमध्ये शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून राज्य सरकारला झटके बसले. या मुद्यावर आक्रमक झालेल्या भाजपने सभात्याग केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिलावरुन प्रश्न विचारले. त्यावर राज्य सरकारने उत्तरे देण्याचे टाळले. त्यामुळे भाजपने सभात्याग केला. Winter Session: Farmers’ electricity bills hit state government in Legislative Council; Aggressive BJP walk out
शेतकऱ्यांच्या माथी ६०-७०हजारांचे वीजबिल मारत आहेत. शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम सरकार करत असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
लक्षवेधी सूचना मांडताना सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना वीज जोडण्या आणि बनावट वीज बिलं पाठवल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीला पैशांची चणचण असून केंद्र सरकारच्या नियमांमुळे पैसे उभारताना मर्यादा येत असल्याचे सांगितले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जळगावच्या शेतकऱ्याला वीज जोडणी दिली नसताना ७३ हजार रुपये बिल दिल्याचे म्हटले. त्याच वेळी सत्ताधारी बाकावरून चोरून वीज घेतली जाते त्याचे काय ? असा प्रश्न केला. यावरून विरोधक आक्रमक झाले. सत्ताधारी आमदाराने शेतकऱ्यांना चोर म्हंटले म्हणून भाजपने गोंधळ घातला आणि सभात्याग केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App