Bawankule : बहुमत असो वा नसो, अपक्षांना सोबत घेणार, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया

Bawankule

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Bawankule राज्यात मतांचा टक्का वाढला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाचा आम्हाला फायदा आम्हाला होईल, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तरी किंवा नाही मिळाले तरी सत्ता स्थापन करताना अपक्षांना सोबत घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.Bawankule

राज्यात बहुमता पेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येतील, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांची गरज भासली तरी त्यांची मदत घेणार आणि गरज भासली नाही तरी देखील त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. निवडून आलेला आमदार हा लोकांचा प्रतिनिधी असतो. निवडून आल्यानंतर त्याच्या मतदारसंघात विकासाची कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुमत असले किंवा नसले तरी अपक्ष आमदार विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राहतील असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.



केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे राज्यात देखील डबल इंजिनचे सरकार हवे, असे महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे. त्यामुळे राज्यात महायुती सरकार येणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्यभरातील लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याचा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे.

महायुतीला 150 प्लस जागा

भारतीय जनता पक्षाला 105 पेक्षा जास्त जागा मिळणार असून महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. इतकेच नाही तर अपक्ष उमेदवार हे विकासासाठी आमच्या बाजूने असतील, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे राज्यात देखील भाजप सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी केला. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देखील राज्यात चांगली कामगिरी आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

Will take independents with us whether we have a majority or not, says BJP state president Bawankule

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात