Assembly Speaker elections : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची शक्यता विरळ होत चालली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर अभ्यास करून निर्णय देऊ, असं आश्वासन दिली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. एवढा अभ्यास बरा नाही. त्याचं ओझं झेपलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. Will Assembly Speaker elections be canceled? The governor will make a decision after studying, Raut says – such a study is not good, it should be done
प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची शक्यता विरळ होत चालली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर अभ्यास करून निर्णय देऊ, असं आश्वासन दिली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. एवढा अभ्यास बरा नाही. त्याचं ओझं झेपलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपले राज्यपाल खूप अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतो. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार काम करायचं आहे. घटनेत स्पष्ट लिहिलंय की मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं.
राऊत पुढे म्हणाले की, 12 आमदारांच्या शिफारशीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या शिफारशी बंधनकारक आहेत. आपल्या संविधानात लिहिलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. शांतता अभ्यास सुरू आहे असं नवीन नाट्य राजभवनात सुरू आहे. आणि त्याचे पात्र जे आहे ते केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या. कारण आता 50 टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटकं होतं असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
त्याचवेळी, भाजपच्या सूक्ष्म देणगी अभियानावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, देणग्या आम्हालाच द्या, इतरांना देऊ नका हा संदेश आहे. सामान्य जनतेला आवाहन असलं तरी ते उद्योपतींसाठी आहे. प्रधानमंत्र्यांनी देणग्या द्या असं म्हटलं गेलं त्यावर आक्षेप घेतले जाऊ शकतात, पण मी घेणार नाही. भाजपला देणगी देऊन देश मजबूत कसा होणार?
राऊत पुढे म्हणाले की, कायद्यानुसार देणगी मागितली जाऊ शकते, पण पंतप्रधानांनी देणगी मागणं हे नैतिकतेला धरून नाही. प्रधानमंत्री सहायता निधीला पैसे मागण्याऐवजी पीएम केअरला मागितले. आता भाजपसाठी देणगी मागितली. आम्हाला पैसे द्या. विरोधकांना पैसे देऊ नका हा संदेश आहे त्यात. दुसऱ्यांना पैसे दिल्यास आम्ही लक्ष देऊ, असा अप्रत्यक्ष इशाराच या पंतप्रधान मोदींच्या देणगीच्या आवाहनात असल्याचे ते म्हणाले.
Will Assembly Speaker elections be canceled? The governor will make a decision after studying, Raut says – such a study is not good, it should be done
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App