पती काही कामधंदा न करता, दारु पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेता, तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करताे आणि माहेरच्या व नातेवाईकां समक्ष अपमानास्पद वागणूक देत असल्याने पत्नीने पती झाेपला असताना, त्याचा नाॅयलाॅनच्या दाेरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील उत्तमनगर परिसरात घडला आहे. Wife murder husband bcoz everytime he demanded money to drink alcohol
विशेष प्रतिनिधी
पुणे : पती काही कामधंदा न करता, दारु पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेता, तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करताे आणि माहेरच्या व नातेवाईकां समक्ष अपमानास्पद वागणूक देत असल्याने पत्नीने पती झाेपला असताना, त्याचा नाॅयलाॅनच्या दाेरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील उत्तमनगर परिसरात घडला आहे. रमेश चंदु भिसे (वय-३७) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून याप्रकरणी त्याची पत्नी नंदीनी रमेश भिसे (४०) हिला पाेलीसांनी अटक केली आहे.
उत्तमनगर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सांगितले की, उत्तमनगर, एनडीए रस्ता याठिकाणी लांडगे निवास मध्ये भिसे कुटुंबीय भाडयाच्या खाेलीत राहते. पाच एप्रिल राेजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीत भांडण झाले हाेते. त्या भांडणानंतर रात्री अडीच वाजता पती दारुच्या नशेत झाेपला असताना, पती हा वारंवार चारित्र्यावर संशय घेताे, दारु पिण्यास पैसे मागताे, नातेवाईकांसमाेर वारंवार अपमान करताे याचा राग येऊन पत्नी नंदिनी भिसे हिने घरातील नाॅयलाॅन दाेरीने त्याचा गळा अवळून खून केला. त्यानंतर मयत बाॅडीस उठवून बसवून त्याचे गळयात दाेरी टाकुन ती दाेरी लाेखंडी हुकास बांधली व पतीने गळफास लावून आत्महत्या केली असा बनाव केला. नंतर मुलास व नातेवाईकांना पतीने गळफास घेतल्याचे दाखवून त्याचे गळयातील दाेरी काढून त्यास फरशीवर झाेपवून पाेलीसांना गळफास घेतल्याची माहिती दिली हाेती. परंतु मयताचा मृतदेह ससुन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेल्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आराेपी महिलेस अटक करुन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आराेपीला १२ एप्रिल पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. याबाबत पुढील तपास सपाेनि दादाराजे पवार करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App