राष्ट्रवादीचा जन्म नेमका कशासाठी??; भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी दिले उत्तर!!

प्रतिनिधी

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म नेमका कशासाठी झाला??, तो कोणाला संपवण्यासाठी झाला?? यावर महाराष्ट्रात नेहमी राजकीय चर्चा होतच असते. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात नव्याने जातिवाद सुरू झाला असेल, असा आरोप राज ठाकरे यांनी वारंवार केला आहे. पण आता त्यापुढे जाऊन भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचा जन्म नेमका कशासाठी झाला??, याचे उत्तर दिले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा जन्म शिवसेनेला संपवण्यासाठी झाला, अशा शब्दांत शरसंधान सुजय विखे पाटलांनी साधले आहे. Why was the NCP born? BJP MP Sujay Vikhe Patil gave the answer

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना संपवण्यासाठी झालेला आहे, असे विधान सुजय विखे पाटील यांनी केले आहे.. संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चा सुरू असताना या विषयाची सुरुवात कोणी केली?? याला ठिणगी कोणी लावली?? आणि आज आगीत कोण जळतेय??, हे महाविकास आघाडीचे चित्र जनता डोळे उघडे ठेवून पाहत आहे, असा तुला सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला लगावला आहे आहे

– शिवसेनेवर फक्त आरोपच

शिवसेना हा पक्ष गेल्या 3 वर्षात फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे. एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीपूर्वीच त्यांना पाठिंब्याची घोषणा केली. त्यापूर्वी हा विषय चर्चेत देखील नव्हता. पाठिंब्याची घोषणा करून त्यांनी हा विषय चर्चेला आणला आणि नंतर तो विषय शिवसेनेकडे वळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

– राष्ट्रवादीवर निशाणा

संभाजीराजे छत्रपती यांना आधी शिवसेनेत प्रवेश करा यानंतर राज्यसभेची संधी देऊ, या ऑफरवर शिवसेना ठाम होती, तर दुसरीकडे संभाजीराजे शिवसेनेत जाण्यास नकार देत अपक्ष उमेदवार म्हणूनच लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. अखेर शिवसेनेने त्यांना धक्का देत आपले कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर सुजय विखे पाटलांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

Why was the NCP born? BJP MP Sujay Vikhe Patil gave the answer

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात