मुख्यमंत्रीपद असून आणि आकडा वाढूनही नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर का??


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडणुकीचे निकाल राज्यातले राजकीय चित्र स्पष्ट करत आहेत. या पार्श्वभूमीवर काही प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी घरोबा करत महाविकास आघाडी सरकार स्थापले. मुख्यमंत्रिपद पटकावले. तरी देखील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर का राहिली?, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा ठरला आहे.Why Shiv Sena is at number four in Nagar Panchayat elections despite having the post of Chief Minister and increasing the number?

2017 ची तुलना केली तर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. फक्त काँग्रेसची नगरसेवकांची संख्या 2017 च्या तुलनेत घसरली आहे. परंतु तरी देखील 2022 च्या आकडेवारीनुसार काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुताई सपकाळ यांची ‘ ती ‘ इच्छा करणार पूर्ण


भाजपचा जमिनी स्तरावरचा राजकीय वावर वाढतो आहे. कारण भाजपची सदस्य संख्या 2017 वरील 344 होती, आता वाढून 417 वर गेली आहे. 24 नगरपंचायतींमध्ये भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवली आहे, तर एकूण 30 नगरपंचायतींमध्ये आघाड्यांच्या साह्याने सत्ता मिळवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आकडेवारी 2017 च्या तुलनेत फक्त 39 ने वाढली आहे. 2017 मध्ये राष्ट्रवादीचे 330 नगरसेवक होते. 2022 मध्ये राष्ट्रवादीची संख्या 369 नगरसेवकांवर पोहोचली आहे. काँग्रेसची सदस्य संख्या 2017 मध्ये 426 होती, ती आता 299 झाली आहे, तर शिवसेनेची 2017 मध्ये सदस्य संख्या 201 होती त्यामध्ये 90 ची भर पडून शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 291 वर पोहोचली आहे.

शिवसेनेच्या वाढीचा हा आकडा मोठा असला तरी विद्यमान राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असताना आणि महाविकासआघाडी तिला तो सर्वात मोठा घटक पक्ष असताना शिवसेनेची कामगिरी चौथ्या नंबरची राहिली आहे आणि त्यामुळेच शिवसेना महाविकास आघाडीत राजकीयदृष्ट्या आकुंचन पावते आहे का? हा प्रश्न विचारला जात आहे.

Why Shiv Sena is at number four in Nagar Panchayat elections despite having the post of Chief Minister and increasing the number?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात