ब्राह्मण संघटना शरद पवारांकडे चर्चेला गेल्याच कशाला??; प्रकाश महाजन यांचा परखड सवाल

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजावर टीका केली. त्यानंतर महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रियांमधून काही ब्राह्मण संघटना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेला गेल्या. परंतु आता या मुद्द्यावरून देखील वाद थांबण्याऐवजी वाढला आहे. Why did the Brahmin organization go to Sharad Pawar for discussion?

भाजपचे वरिष्ठ नेते कै. प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी तर ज्यांची ब्राह्मण समाजा विषयीची मते पूर्वग्रहदूषित आहेत, त्या शरद पवारांकडे ब्राह्मण संघटना चर्चेसाठी गेल्यास कशाला?? असा परखड सवाल केला आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते पूर्वग्रह दूषित दृष्टीने ब्राह्मण समाजाला सॉफ्ट टार्गेट करतात हे माहिती असूनही ब्राह्मण संघटनांचे नेते त्यांच्याकडे गेले यावरून प्रकाश महाजन जोरदार शरसंधान साधले आहे.

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अनेक वक्तव्यांवर प्रकाश महाजन यांनी सडेतोड टीकास्त्र सोडले. प्रकाश महाजन म्हणाले शरद पवारांनी अमोल मिटकरी यांना माफी मागायला सांगितले का?? मग कशाला ब्राह्मण संघटना त्यांच्याकडे चर्चेला गेल्या?? शरद पवारांकडे ब्राह्मण संघटना भेटीला गेल्यानंतर पवार आणि ब्राह्मण संघटना हे एकत्रित पत्रकार परिषद घेतील, असे वाटले होते. पण पवारांनी एकट्यानेच पत्रकार परिषद घेतली आणि ब्राह्मण संघटनांनी आरक्षण मागितल्याचे सांगितले. पण ब्राह्मण समाजाने आरक्षण मागितले नाही. आम्ही कधी मोर्चे काढले नाहीत.



ब्राह्मण समाजाने कधीही कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे समर्थन केले नाही. तरी देखील फक्त अफजलखानाचा अंगरक्षक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या मुद्द्यावरून टीका केली जाते. पण अफझलखानाचे दोन अंगरक्षक मोहिते होते, यावरून कोणी टीका करताना दिसत नाही. त्याचबरोबर स्वतः समर्थ रामदास स्वामींनी कधीही आपण शिवाजी महाराजांचे गुरु होते असे म्हटले नाही किंवा स्वतः शिवाजी महाराजांनी कधीही माझे गुरु समर्थ रामदास होते असे म्हटले नाही. परंतु शरद पवार आवर्जून दरवेळेला रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असे सांगत असतात याकडे प्रकाश महाजन यांनी लक्ष वेधले.

ब्राह्मण समाजाला टार्गेट करून शिव्या दिल्या जातात. तुम्ही राज्यकर्ते आहात म्हणून काही वाटेल ते कराल का??, एकदा सगळ्या ब्राह्मण समाजाल अरबी समुद्रात बुडवून टाका आणि काय राज्य करायचे ते करा, असे उद्दिन उद्गार देखील प्रकाश महाजन यांनी काढले.

प्रकाश महाजन यांनी आपल्या घरातील उदाहरण देखील यावेळी आवर्जून विशद करून आमच्या घरात ब्राह्मण-ब्राह्मणेतर विषयच नाही माझ्या बहिणीने 40 वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्याशी लग्न केले. ते ओबीसी नेते होते. माझ्या मुलीने मराठा समाजातल्या मुलाशी लग्न केले. मग ब्राह्मण म्हणून आम्ही का शिव्या खायच्या??, असा सडेतोड सवाल देखील त्यांनी केला. प्रकाश महाजन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी क्रिया प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत.

Why did the Brahmin organization go to Sharad Pawar for discussion?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात