अटक होणार हे समजल्यानंतर नीतेश राणे गायब आहेत.त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.Why are those who were meowing now hiding? – Gulabrao Patil
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या वादातून काही दिवसांपूर्वी संतोष परब या शिवसैनिकावर हल्ला झाला होता.दरम्यान हा हल्ला आमदार नीतेश राणे व गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून झाला अशी तक्रार परब यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान अटक होणार हे समजल्यानंतर नीतेश राणे गायब आहेत.त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान फडणवीसांच्या या टीकेवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, ‘विरोधी पक्ष नेत्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण नारायण राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे निष्पाप आहेत तर ते लपून का बसले ?ते पोलिसांच्या समोर का येत नाहीत?विधानभवनात आदित्य ठाकरेंना पाहून ज्या पद्धतीनं नीतेश राणे म्याव म्याव करत होते, मग आता ते लपून का बसले आहेत?, असा सवाल यावेळी गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App