विशेष प्रतिनिधी
माजलगाव : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव या खेडेगावात एक विचित्र घटना घडली आहे. या खेडेगावात बऱ्याच माकडांचा वावर नेहमीच असतो. तर तेथील माकडांनी एकूण 250 कुत्र्याच्या पिल्लांना मागील 3 महिन्यात मारल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या पिल्लांना उचलून ते बिल्डिंगवर किंवा झाडांवर नेतात आणि वरून सोडून देऊन मारून टाकतात. अशा एक नाही तर तब्बल 250 घटना घडल्या आहेत.
Why 250 dogs and puppies were killed by a gang of monkeys in the same village? The incident was reported by international newspapers
या सर्व घटनांदरम्यान गावकऱ्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे याबाबत तक्रार देखील केली होती. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्रयत्न करून एकाही माकडाला ते पकडू शकले नाहीत. असे न्यूज18 ने दिलेल्या बातमीनुसार कळते. एका 8 वर्षीय मुलावर देखील माकडांच्या गँगणे हल्ला चढवला होता. गावकऱ्यांनी दगड मारून माकडांना पळवून लावले होते म्हणून त्या मुलाचे प्राण वाचले. कुत्र्यांच्या पिल्लांना वाचवण्याचा बऱ्याच गावकऱ्यांनी प्रयत्न केला. त्यात बऱ्याच लोकांना दुखापत झाली होती.
माकडांचा त्रास इतका वाढला की त्यांनी आता शाळेत जाणाऱ्या मुलांवरदेखील हल्ला करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे विनंती केली आहे की लवकरात लवकर या माकडांचा बंदोबस्त करण्यात यावा.
माकड दाढी करायला गेले पार्लरमध्ये? व्हायरल व्हिडीओ पहिला का?
तर हे सर्व कशासाठी?
तर गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मागे कुत्र्याच्या एका पिल्लाने माकडाच्या एका पिल्लाला मारून टाकले होते. त्यानंतरच या घटना घडायला सुरवात झाली होती. असे करत मागील तीन महिन्यात तब्बल 250 कुत्र्यांना आणि त्यांच्या पिल्लांना माकडांच्या गँगणे मारून टाकले आहे. आता गावामध्ये कुत्रे आणि कुत्र्याची पिल्ले देखील नाहीयेत असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
या घटनेची दखल न्यूयॉर्क टाइम्स, सॅमबॅड इंग्लिश अश्या अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी देखील घेतली आहे.
मागे कर्नाटकमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. एक माकड तब्बल 22 किलोमीटर एका माणसाचा बदला घेण्यासाठी गेले होते. फॉरेस्ट डिपार्टमेंटने या माकडाला पकडून पुन्हा जंगलामध्ये सोडून दिले होते. तर एका ट्रकमध्ये बसून हे माकड पुन्हा त्या माणसाचा बदला घेण्यासाठी त्याच गावात दाखल झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App