विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पीक विमा योजना ही फसवी असून पीक विम्याचा फायदा कोणत्याच शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ही योजना फक्त कागदावर असून या योजनेची माहिती मिळवण्यास गेल्यास बँक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशी माहिती रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी दिली. Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded
कोरोनामुळे शेतकरी ,शेतमजूर , व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. महागाईने तर उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. महागाईचा परिणाम बियाणे व खतांवर देखील झाला आहे. त्यांचे भाव खूप वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. शासनाने बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करावे, असे रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App