Ajit pawar : अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचा चक्रव्यूह रचला, की कुणी माध्यमांमधून बातम्यांच्या पुड्या फेकल्या??

ajit pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुतीतले तीन घटक पक्ष भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची ( ajit pawar ) राष्ट्रवादी यांच्यात सध्या काही “बरे” चाललेले नसून वेगवेगळी चक्रव्यूह रचून अजितदादांना ( Ajit pawar )  महायुतीतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी सध्या चालवल्या आहेत. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सूत्रांचा अहवाला दिला आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीची महायुतीमध्ये 80 जागांची मागणी आहे. परंतु ती पूर्ण करता येणे शक्य नाही. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने आक्रमकपणे हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहेत, तो देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीला रुचत आणि पचत नाही. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीने अनेकदा तक्रारी करून पाहिल्या, पण भाजप आणि शिवसेनेचे नेते हिंदुत्वाचा मुद्दा बिलकुल सोडायला तयार नाहीत. ते अधिक आक्रमकपणे मुसलमान समाजाविरुद्ध बोलतच राहिलेत, हाच अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचा एक चक्रव्यूह आहे, असा दावा मराठी माध्यमांनी बातम्यांमधून केला आहे.



अजितदादांनी शरद पवारांनी विरुद्ध पवित्रा घेताना त्यांच्याबरोबर 40 आमदार आले. त्यामुळे त्यांनी दुप्पट जागांची मागणी केली. पण अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे 60 जागा लढविल्या, तरी देखील ते महाविकास आघाडी आणि महायुतीला चांगली टक्कर देऊ शकतील, असा दावाही मराठी माध्यमांच्या बातम्यांमध्ये दिसून येत आहे.

परंतु महायुतीमध्ये सध्या “बरे” चाललेले नाही, हा निष्कर्ष कशाच्या आधारे काढला आणि “बरे” चालले नसेल, तरीहो महायुती तुटण्यापर्यंत आणि अजितदादांना बाहेर काढण्यापर्यंत महायुतीचे नेते जातील का?? केंद्रातले दोन सर्वांत वरिष्ठ नेते महायुतीतल्या नेत्यांना तसे करू देतील का??, या सवालांवर माध्यमांनी चकार शब्द काढलेला नाही. महायुती टिकणे किंवा महायुती मोडणे याचा निर्णय मुंबईत स्थानिक पातळीवर कोणी घेणार नाही, तर तो दिल्लीतच घेतला जाईल ही बाब सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट असताना त्याकडे माध्यमांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचा चक्रव्यूह खरंच कुणी रचलाय की अन्य कुणी आपल्या राजकीय फायद्यासाठी बातम्यांच्या पुड्या माध्यमांमधून फेकल्यात??, हा कळीचा सवाल आहे.

Who really trapped ajit pawar??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात