काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.Who is Aryan Khan who was arrested at a drug party? Read detailed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे.काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरिअर डिझायनर-चित्रपट निर्माती गौरी खान यांचा सर्वात मोठा मुलगा. आर्यन खान २३ वर्षांचा आहे. त्याने लहानपणीच काही बॉलिवूडपटांसाठी डबिंग करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये द लायन किंग, द इन्क्रेडिब्ल्स (हम है लाजवाब) यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. २००४ मध्ये त्याला हम है लाजवाब या अॅनिमेशनपटासाठी सर्वोत्कृष्ट डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कारही मिळाला होता.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यनचा मोबाईल जप्त केला आहे. त्याच्या मोबाईलवरून मिळालेल्या चॅट्सची छाननी केली जात आहे. त्याचे व्हॉट्सॲप चॅटही तपासले जात आहेत. रेव्ह पार्टीबाबत या चॅटमध्ये काही चर्चा झाली होती का? या रेव्ह पार्टी पूर्वीपासूनच सुरू आहेत का? आदी माहिती एनसीबी घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
असे सांगितले जात आहे की ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्या उर्वरित लोकांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. तिन्ही बड्या उद्योगपतींच्या मुली सांगितल्या जात आहेत.
एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयातून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा तपास फक्त आणि कायद्याच्या कक्षेतच केला जात आहे. ज्याने भूमिका बजावली, त्याच्यावर कारवाई केली जाईल.
आर्यन याची कसून चौकशी केली असता मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावलं होतं. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसे भरले नव्हते. ऑर्गनायजरने माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं, असा दावा आर्यनने केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष शाहरूख खान काय प्रतिक्रिया देणार, याकडे लागले होते. शाहरुख खानची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेकांनी धावाधावही सुरु केली. मात्र, शाहरूख खान सध्या दुबईत असल्याची माहिती समोर आली आहे.
दुबईत सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. शाहरुख खान हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा मालक आहे. ही स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर उभी आहे. त्यामुळेच शाहरूख सध्या दुबईत असल्याचे कळते. दरम्यान, आर्यन खानवरील कारवाईनंतर पोलिसांचे कोणतेही पथक अद्याप शाहरूख खानच्या घरी गेलेले नाही. त्यामुळे आता शाहरुख खान मुंबईत कधी परतणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
२००१ मध्ये कभी खुशी कभी गम चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने शाहरुखच्या बालपणीची भूमिका साकारली होती. २००६ मध्ये कभी अलविदा ना कहना सिनेमातही तो झळकला होता. लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतलं. तर युनिव्हर्सिटी ऑफ सदन कॅलिफोर्नियामधून त्याने चित्रपट निर्मिती आणि लेखन विषयात पदवी मिळवली.
महाराष्ट्रातील ताईक्वांदो स्पर्धेत त्याला २०१० मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्याच्याकडे ब्लॅक बेल्ट असून मार्शल आर्ट्समध्येही तो प्रशिक्षित आहे. त्याला क्रीडा क्षेत्रातही विशेष रस आहे.२०२० मध्ये आर्यनची संपत्ती १२० ते १४० मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App