WATCH :सफेद भेंडीच्या उत्पादकांना अच्छे दिन ! सफेद भेंडीचा दर वधारला, शेतकरी आनंदले

विशेष प्रतिनिधी

अंबरनाथ : श्रावण महिना सुरु झाला की खवय्यांना माळरानांवरच्या भाज्यांचे वेध लागतात. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माळरानांवर विविध फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने पावसाळ्यात भेंडी, पडवळ, शिरोळे यांचे उत्पादन हे सर्वाधिक घेतले जात असते.White Leady Finger vegetable Market Flourished

यंदा या सर्व भाज्यांमध्ये सफेद भेंडीचा दर बाजारात वधारला असून उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.बाजारात शेतकऱ्यांकडून सफेद भेंडी १२० ते १४० रुपये प्रति किलोने विकत घेतली जात आहे. त्यामुळे कोरोनानंतर शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. भेंडी आयुर्वेदिक भाजी आहे.



त्यामुळे अनेक जण भेंडीच्या भाजीला पावसाळ्यात अधिक महत्व देत असतात. मात्र यंदा सफेद भेंडीने बाजारात किंमतीचा चांगलाच उच्चांक गाठलेला आहे. हिरवी भेंडी बाजारात सहजच उपलब्ध होते.

मात्र,यंदा सफेद भेंडीने बाजारात दराची शंभरी पार केली आहे. मलंगगड भागातील काकडवाल आणि कुंभार्ली गावच्या माळरानांवर सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे.सफेद भेंडीसाठी किलो मागे १२० ते १४० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • अंबरनाथ तालुक्यात भेंडीचे सर्वाधिक उत्पादन
  • सफेद भेंडीने बाजारात दराची शंभरी पार केली
  • बाजारात किलोला १२० ते १४० रुपयांचा दर
  • शेतकऱ्यांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण
  •  पावसाळ्यात माळरानावरील भाज्यांना पसंती
  • भेंडी, पडवळ, शिरोळे यांचे उत्पादन वाढले

White Leady Finger vegetable Market Flourished

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात