भेंडी बाजारात कोठून आले शेतकरी, आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसविल्याचा प्रवीण दरेकर यांचा आरोप


भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी? या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली आहे. Where did the farmers come from in the okra market?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी? या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवले आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली आहे.

आझाद मैदानात शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. या आंदोलनात लोकं घुसवली आहेत. इथली लोकं शेतकरी म्हणून आंदोलनात घुसली. भेंडीबाजारात कुठून आलेत शेतकरी? असा सवाल दरेकर यांनी केला.आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशा प्रकारची गर्दी गोळा करण्याची आघाडीवर वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली. या आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता सहभागी झाला नाही. त्यावरूनही दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणाले, आजच्या आंदोलनाने शिवसेनेला भूमिकाच नाही हे स्पष्ट झालं आहे. आता रोखठोक भूमिका घेणारी शिवसेना उरली नाही. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना मोर्चात येऊ नको म्हणून सांगितलं. पवारांचा हा सल्ला समजायला वेळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच सोडा पण शिवसेनेचा एकही नेता या आंदोलनाकडे फिरकला नाही. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. पण काही राजकीय पक्ष त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करत आहेत, असा टोलाही त्यांनी केला.

Where did the farmers come from in the okra market?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था