कंत्राटी भरतीवरून फडणवीसांवर निशाणा साधताना सुप्रिया सुळेंनी दिली आपल्याच आघाडी सरकारांच्या मंत्र्यांची यादी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन छेडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीच्या मूळाशी जाऊन काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकार आणि महाविकास आघाडी सरकार यांची पोलखोल केली. त्यांनी पत्रकार परिषदेत वेगवेगळे जीआर पुराव्यांसह सादर केले. While targeting Fadnavis over contract recruitment, Supriya Sule

मात्र कंत्राटी भरतीचा मुद्दा काँग्रेस – राष्ट्रवादीनेच बनविलेल्या आघाड्यांच्या जुन्या सरकारच्या अंगाशी येतोय हे पाहिल्यावर शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यमान सरकार मधील मंत्र्यांच्या दोन याद्या आपल्या ट्विटर हँडल वर दिल्या आणि फडणवीसांना प्रश्न विचारायचे असतील, तर या मंत्र्यांना विचारा, असे लिहिले.

हे सर्व नेते आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार मधले आणि नंतरच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधले मंत्री आहेत, असे असताना देखील भाजपच्या प्रभावाखालच्या मंत्रिमंडळात शिंदे – फडणवीस सरकारने कंत्राटी भरतीचे जीआर रद्द केले. मात्र हा महत्त्वाचा मुद्दा सुप्रिया सुळे ट्विटर हँडल वरचा मजकूर लिहिताना विसरल्या.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट असे :

भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे.

आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे . उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती. कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ आणि २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही. भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा.

२०११ सालातील मंत्री

1. विजयकुमार गावीत, 2. राधाकृष्ण विखे पाटील, 3. अजित पवार, 4. नारायण राणे, 5. दिलीप वळसे पाटील, 6.छगन भुजबळ, 7. सुनील तटकरे, 8. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री

1. एकनाथ शिंदे 2. अजित पवार, 3. दिलीप वळसे पाटील, 4. छगन भुजबळ, 5. उदय सामंत, 6. धनंजय मुंडे, 7. शंभूराज देसाई, 8. गुलाबराव पाटील, 9. दादा भुसे, 10. संजय राठोड, 11. संदीपान भुमरे, 12 अब्दुल सत्तार, 13. संजय बनसोडे, 14. आदिती तटकरे

सुप्रिया सुळे यांनी वर उल्लेख केलेले सर्व नेते आत्ता शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री आहेत. परंतु भाजपच्या प्रभावाखालच्या याच मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने कंत्राटी भरतीचा जुना जीआर रद्द करून दाखविला आहे. याचा तपशील सुप्रिया सुळे यांनी दिलेला नाही.

While targeting Fadnavis over contract recruitment, Supriya Sule

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub